पान:रुपया.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( १९)

असतील त्या हिंदुस्थानांत व लंडनमध्ये व्याजी लावाव्या. (११) नोटांचे रुपये देण्याच्या सोई जास्त कराव्या. (१२) सरकारी वर्ष १ जानेवारीपासून सुरू करावे. सरकारने शिलकीतून प्रेसिडेन्सी बँकांना पैसे देऊन, ती शिल्लक लोकांना उपयोगी होईल असे करावे. (१३) शिल्लक लंडनमध्येही पाठविणे इष्ट आहे.कारण त्यामुळे नवीन कर्ज काढण्याचे टाळता येते.( १४ ) पुष्कळसे कर्ज हिंदुस्थानांतच काढावें. ( १५ ) कौन्सिलबिलें किती व कोणच्या दराने विकावी यासंबंधानें स्टेटसेक्रेटरीस निबंध असू नये ; तथापि व्यापाराच्या सोईकरितां वाटेल तितकी बिलें विकणे हे अनिष्ट आहे. ( १६) लंडनमध्ये व्याजी लावलेला हिंदुस्थानचा पैसा जाहीर रीतीने उत्तम ठरलेल्या संस्थांस द्यावा व तो थोड्या मुदतींत परत घेता येईल असा असावा. (१७) इंडिया ऑफिसची फायनॅनशियल कमिटी' चालू ठेवावी, बंद करू नये. यांतील सभासद असे असावे.एक सरकारी फायनॅनशियल खात्यांतील ; एक हिंदुस्थानांतील व्यापारी ( अनुभव असलेला ; ) एक लंडनमधील व्यापारी ( अनुभव असलेला ); एकूण तीन असावे. ( १८ ) अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट दोन असावे व त्यांपैकी एकास जमाखर्चाचे ज्ञान असावे. ( १९) स्टेट बँक असावी किंवा नसावी हे ठरविण्याकरितां लवकरच एक कमिटी नेमावी व तिच्या मदतीने हा प्रश्न कायमचा सोडवून टाकावा.