पान:रुपया.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२६)

महायुद्धाच्या पांच वर्षांत एकंदर १०४ कोटींच्या वर रुपये नवीन पाडले गेले. १८९३ पूर्वी वीस वर्षेपर्यंत हिंदुस्थानांतील लोकसंख्या व व्यापार वाढत असतांदी, रुपयाची क्रयशक्ति स्थिर होती व किंमती होत्या तशाच होत्या.
 या चलनाच्या वृद्धींचे अथवा द्रवीभवनाचं (Reretication) मुख्य कारण कौन्सिलबिलांची होमचार्जेसच्या इयत्तेपेक्षा अधिक असणारी किंमत है होय कौन्सिलचिलें अधिक विकल्यामुळे, हिंदुस्थानांत सोनें न येतां लोकांच्या हातांत रुपये पडतात. रूप- यांची जरूर नसली तरीही, ते अटविण्यांत नुकसान असल्या- मुळे, ते जसेच्या तसेच रहतात. हिंदुस्थानांत जर सोन्याच नाणे असून खुली टांकसाळ असती, तर नाणे जास्त झाल्यास, तं अटवितां आलें असतं व व्यापाराकरितां जरूर लागल्यास पुनः अटविलेल्या गटांचे नाणे पाडता आले असते; परंतु रुपया है उपनाणं असून, त्याची किंमत कृत्रिम असल्यामुळे, हें कार्य घडून येत नाहीं. दरवर्षी कौन्सिलबिलांबद्दल मिळालेले रुपये चलनांतच राहतात व चलन अधिक अधिक द्रवीभूत होत जाते.
 महायुद्धामध्ये या चलनांत आणखी नोटांची भर पडली. पूर्वी अदमास ४० कोटि रुपये किंमतीच्या नोटा होत्या,त्या हल्ली १८० कोटि रुपयांपर्यंत गेलेल्या आहेत. महायुद्धाकरितां आवश्यक अशा वस्तु अतिशय महाग झाल्यामुळे, त्या विकत घेण्याकरितां अधिक चलनाची जरूर पडली. हे चलन मिळण्यास