पान:रुपया.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२५ )

 १८९३ पूर्वी रुपया हा अतिशय स्थिर होता; परंतु १८९३- नंतर त्याची क्रयशक्ति दिवसेंदिवस कमी कमी होऊं लागली. १८९४ साली किंमतीचा सूचकअंक Index number) ११४ होता, तो १९०० साली १९२ झाला. याचा अर्थ, ज्या वस्तुं ११४ रुपयांस पहिल्या सालांत मिळत होत्या, त्यांना दुसऱ्या साली १९२ रुपये पडूं लागले १९०८ साली हा सूचकअंक २३१ होता व १९१३ मध्ये १९९ होता.
आतां कोणी असे ह्मणेल कीं, ह्या किंमती हिंदुस्थानांतच अधिक झाल्या नसून, इंग्लंड इत्या दे देशांतही अधिक झाल्या होत्या. त्यामुळे येथील चलन है किंमती वाढण्याचे कारण नसून, सार्वत्रिक कांहीं तरी अन्य कारणें असली पाहिजेत ; परंतु ही विचारसरणी आमक ठरते कारण इंग्लंडमध्ये जरी किंमती वाढलेल्या आहेत. तरी हिंदुस्थानांतील किंमतीच्या तुल- नेनें त्या कांहींच नाहीत. इंग्लंडांतील सूचकअंक १८९४ साली ६३ होता तो १९०० मध्ये ७५ झाला; आणि १९०८ मध्ये ७३ होता.
 यावरून असे स्पष्ट होतें कीं, हिंदुस्थानांतील किंमतीची वाढ ही फक्त स्थानिक कारणावर अवलंबून होती व हें स्थानिक कारण अणजे रुपयांची अमर्याद संख्या हे होय. १८९३ च्या पूर्वी वार्षिक नवीन पाडलेल्या रुपयांची सरासरी ७ कोटि रुपये होती ; परंतु १९०० नंतर ही सरासरी १४/१५ कोटि रुपये झाली व