पान:रुपया.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२४ )

खोटे या ह्मणीप्रमाणे स्थिति होय. रुपया उपनाणें ह्मणावें तर वाटेल त्या रकमेपर्यंत रुपये देतां येतात. वरें, रुपया मुख्य नाणं प्यावें, तर चेंबरलेन कमिशनत्रमाणे रूपयाची किंमत स्वतःसिद्ध कांही नसून, रुपया ह्मणजे पौंडाचा एकपंधरांश अशी त्याची व्याख्या केली आहे. हणजे जेव्हां एखाद्यास आझ १५ रुपये देतो, तेव्हां त्यास एक पौंड देतो असे समजावयाचें. मुख्य नाणे पौंड हैं असून, रुपया हा त्याचा एक भाग अथवा हिस्सा आहे. असे जरी आहे, तरीही चलनांत पौंड नाहीत यामुळे बैंड है मुख्य नाणे आहे असे ह्मणणें हास्यास्पद दिसतें.फार झाले तर पौंड हें हिशोबाचें मापन (standard of account) आहे असे ह्मणतां येईल. त्यामुळे हल्लींच्या चलनाचें वर्णन सार्थ रीतीनं करणें दुर्घद झाले आहे.
 आतां हल्लींच्या चलनापासून गेल्या वीस पंचवीस वर्षांत काय काय आर्थिक अनर्थ उद्भवले आहेत ते पाहूं. पहिला अनर्थ- कास्क परिणाम असा की, या चलनामुळे महर्षता भयंकर वाढली आहे. पूर्वी रुप्याचे चलन असल्यामुळे, सोन्यांतील किंमतीचा व हिंदुस्थानांतील किंमतीचा विशेष संबंध जोडलेला नसे.जो माल. युरोपांत जाई, त्याच्या किंमतीवर मात्र सुवर्णचलनाचा क त्यांत दर्शविलेल्या किंमतीचा परिणाम होई; परंतु रुप्याचा व पौंडांचा संबंध जोडल्यापासून आमच्या प्रत्येक किंमतीवर यूरो- पांतील सोन्याच्या किंमतीचा परिणाम होऊं लागला.