पान:रुपया.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२३ )

त्यामुळे असंतोष, संप, मजुरीचे व नफ्याचे दर वाढणे इत्यादि अनिष्ट परिणाम जास्त जास्त दृग्गोचर होऊं लागले आहेत.
 उत्तम चलनपद्धतीचा नियम असा आहे की, जे नाणे उप- नाणे असतं, तें कायदेशीर चलन फक्त एका ठरीव मर्यादेपर्यंत असतें. ह्या नियमास अनुसरून रुपया है उपनाणे असल्यामुळे, शंभर किंवा हजार रकमेच्या वरील देणे सोन्याच्या मुख्य नाण्यांत दिले पाहिजे असा निर्बंध पाहिजे; परंतु वस्तुस्थिति तशी नाहीं। रुपया हें वाटेल त्या मर्यादेपर्यंत कायदेशीर फेडीचे चलन आहे. परंतु त्याची किंमत मात्र कृत्रिम आहे. अशा रीतीने दहा अकर. आणे किंमतीचें नागें सोळा आण्यांचें ह्मणून लोकांवर लाइले जातं. यास उपाय मुख्य नाणे सोन्याचें करणे हाच होय. प्रत्यक्ष चलनांत सोन्याची नाणी पुष्कळ असावीं अर्से कोणाचेही मत नाहीं. बहुतेक व्यवहार नोटांच्या मदतीने करावा; परंतु नोटा दिल्या असतां, सॉव्हरिन अथवा दुसरें सोन्याचे नाणे मिळण्याची व्यवस्था असावी व रुपया हा खरोखरीच मोड़ अथवा परचुटण या स्वरूपाचा असावा. उपनाण्याला मुख्य नाणे करून त्याला कृत्रिम किंमत देण्याची क्लृप्ति हिंदुस्थानाशिवाय इतरत्र कचितच आढळेल. येणेप्रमाणे गेली वीस पंचवीस वर्षे, आमचे चलन, अर्थशास्त्राच्या नियमांस धाब्यावर बसविणारें अर्से झाले आहे.
 अशा रीतीनें कायद्याप्रमाणे सुवर्णचलन असतांही, प्रत्यक्ष व्यवहारांत रुप्याचेंच चलन झालेले आहे. नांव मोठे व लक्षणं