पान:रुपया.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२२ )

नेहमींच्या व्यापाराच्या आकारावर व निर्यात आणि आयात मालाच्या किंमतीवर अवलंबून राहील व तिच्यामधील कृत्रिमपणा नाहीसा होईल.
 हल्लींच्या पद्धतीमध्ये कौन्सिलविले फाजील विकली जात अस त्यामुळे, आणखी एक दुष्परिणाम घडून येत आहे. तो हा की, चलनांत रुपये अधिक अधिक आल्यामुळे, त्याचा किंमती- वर परिणाम होऊन, महर्षता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १८९३ पासून १९१४ पर्यंत जी सारखी महर्षता वाढत चालली; तिचे मुख्य कारण चलनाची अमर्याद वाढ है होय, असे नामदार गोखले यांनी आपल्या बजेटावरील भाषणांत अनेक वेळां प्रति- पांदन केले आहे. आयात मालापेक्षां निर्यात जितकी जास्त आहे, तेवढ्याबद्दल रुपे किंवा सोने हिंदुस्थानांत आले असते तर चलन बाढले नसते व किंमती जास्त स्थिर राहिल्या असत्या ही मोष्ट निर्विवाद आहे.वास्तविक पहातां, टांकसाळ बंद कर ण्याचा मुख्य उद्देश हा होता की, नवीन रुपये पाडण्याचे बंद करून, रुपयांची टंचाई उत्पन्न करून, रुपयाची किंमत वाढविणं. तो उद्देश बाजूला राहून, गेल्या वीस वर्षांत सरकारी रीतीनें रुपये चलनांत इतके आले की, चलन पाण्यासारखे पातळ झाले आहे व त्याचा नैसर्गिक परिणाम किंमतीची वाढ हा अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा रीतीनं हल्लीच्या पद्धतीपासून रुपयाची किंमूल अथवा क्रयशक्ति स्थिर न राहता सारखी बदलत चालली आहे.