पान:रुपया.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२१ )

इंग्लंडांत असतांही, आह्मांस रुपयांवरच निर्वाह करणे भाग पडते. होमचार्जेस ' चें देणें सोन्यांत असल्यामुळे, सोन्याच्या नाण्याशी संबंध येतो व त्यामुळे रुपया व कोणतें तरी सोन्याचें नाणे यांचें नक्की प्रमाण ठरवावे लागते. हा एवढा उपद्व्याप करण्यापेक्षा, येथेंच सोन्याचें नाणे सुरू केल्यास, 'होमचार्जेस' चा प्रश्न अगदी सोपा होईल. जेवढे पौंड देणे असेल तेवढे पौंडांमध्ये दिले व बाकीचे पौंड आमच्या नांवें लंडन येथील इंपीरियल बँकेंत भरले झणजे कोणतीही भानगड उरली नाहीं. हे सोनें अथवा पौंड ती बँक हिंदुस्थानांत पाठवून त्यांच्या आधारावर नोटा काढून वाटेल तितका व्यवहार करूं शकेल व अशा रीतीनें हल्लींची निधींची रक्कम आमच्या व्यापारास हितावह होईल.
 दोन देशांमधील हुंडणावळ ही व्यापाराच्या नेहमींच्या स्थिती- बर अवलंबून असते हें गेल्या दोन तीन वर्षांत सर्वांच्या चांगले प्रत्ययास आले आहे. हुंडणावळ कृत्रिम रीतीने ठरविल्यास या नैसर्गिक स्थितीस विरोध होऊन, आयात व निर्यात माल यांच्या नैसर्गिक हालचालीस कृत्रिम स्वरूप येतं. पौंड व रुपया यांमध्ये ठरीव प्रमाण स्थापित केल्यानें, हुंडणावळ ही पक्की होते व तिचा आणि व्यापाराचा नैसर्गिक संबंध राहत नाहीं. या -कारणाकरितां सुवर्णसंलग्नचलन है कृत्रिम असून, नैसर्गिक व्यापा- राच्या घडामोडीस अनुसरून नाही हे स्पष्ट आहे.इंग्लंड क हिंदुस्थान या दोनही देशांत सोन्याचें नाणें झालें लणजे हुंडणा-