पान:रुपया.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२० )


देऊन पौंड मिळण्यास अडथळा होतो.रुपें महाग झाल्यास एका पौंडास १५ रुपये देणे जड जाते.अशा रीतीनें एक ठराविक प्रमाण दोन नाण्यांमध्ये राखण्यास अकटोविकट श्रम करावे लागतात व अनेक संस्था उत्पन्न करून हे कृत्रिम गार्डे चालू राहील अशी व्यवस्था ठेवावी लागते. सोन्याचें नाणें अस- ल्यास ही सर्व खटपट वांचेल व शक्तीचा अपव्यय होणार नाहीं.
 आतां इंपीरियल बँक निघाल्यामुळे इंग्लंडांतील सर्व निधि येथे परत आणणे शक्य आहे. आवश्यक तेवढा निधींचा भाग इंग्लंडांत ठेवून बाकी सर्व सोनें हिंदुस्थानांत आणून सोन्याचें नाणें सुरूं केल्यास हल्लीच्या कृत्रिम पद्धतीचें बहुतेक दोष नाहीसे होतील. टांकसाळ खुली केल्यास लोक आपल्या जवळचे सोनें देऊन सो- न्याचे नाणे पाडून घेतील. सोन्याचें नार्ण कमी पडेल ही शंका व्यर्थ आहे. शिवाय कौन्सिल विलें निघण्याची बंद केलीं ह्मणजे आयात व निर्यात यांमधील जो फरक असतो तेवढी सर्व रक्कम हिंदुस्थानांत सोन्याच्या रूपाने आलीच पाहिजे. हें सोने किंवा ह्रीं नाणी चलनांत उपयोगांत आणतां येतील व याप्रमाणे पांच चार वर्षांच्या शिलकीचा उपयोग केल्यास २००/३०० कोटींचें सोन्याचें नाणे हिंदुस्थानांत सहज रीतीनें होऊं शकेल.
 हल्लींच्या पद्धतीप्रमाणे ५०/७५ कोटींचा निधि व्यर्थ इंग्लंडांत ठेवावा लागतो व त्याचा फायदा आमच्या व्यापारास न मिळतां इंग्लंडांतील व्यापारास मिळतो. शिवाय इतक्या किंमतीचे सोने