पान:रुपया.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १०३. - -- गुणदोषविवेचन. हिंदुस्थानांतील चलनपद्धतीच्या सर्व अवयवांचे आतापर्यंत आविष्करण केले. आतां एकंदर पद्धतीचे गुणदोष काय आहेत हे पाहून या पद्धतींत कोणते फेरबदल करणे इष्ट आहे हे या प्रकरणांत पाहिले पाहिजे. प्रचलित पद्धतीचा मोठा दोष हा आहे की, ही पद्धति अतिशय कृत्रिम आहे. सोन्याचे व रुप्याचे मूल्य बदलले असतांही दोन नाण्यांमध्ये ठराविक गुणोत्तर राखण्याचा प्रयत्न करणे हे एकंदरीने नैसर्गिक कारणांशी विरोध करण्यासारखं । आहे. रुपें स्वस्त आहे तोपर्यंत एका डास पंधरा रुपये देण्याचे वचन पाळतां येईल; परंतु रु एका विविक्षित मर्यादेच्या पलीकडे गेल्यास १ : १५ हे गुणोत्तर कायम ठेवता येणे शक्य नाही. अशाच तहेची आपत्ति महायुद्धांत आल्यामुळे ही पद्धति दासठून पडण्याच्या बेतांत आला. नंतर काही काळाने पैड व रुपया यांतील प्रमाण बदलावे लागले. : हल्ली हे प्रमाण कायद्याप्रमाणे १ : १० आहे; परंतु हे कदाचित् १ : २० असंहीं होऊ शकेल. सोने व रुपे यांच्या किंमती जशा बदलत जातील, तसे हैं। माणु वदलावं लागेल,