पान:रुपया.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१७)

स्थान सरकारच्या फडणिसांनी आपल्या मुखानें कबूल केले आहे ह्रीं त्यांतल्यात्यांत आनंदाची गोष्ट आहे.
 हुंडणावळीचा भाव जरी अशा तऱ्हेनें वाढत गेला, तरीसुद्धां हुंड्या विकण्याचें अगदी बंद झाले नव्हते. १९१४ चे आगष्ट- पासून १९१५ चे जानेवारीपर्यंत, १९९५चे जूनपासून सप्टेंबर- पर्यंत, १९१८ च्या अखेरीस १९२० च्या जानेवारीपासून त्या सालच्या अखेरपर्यंत उलट हुंडया विकण्याचा प्रसंग आला. या: शिवाय इतर सर्व महिन्यांत हुंड्या विकल्या जात होत्या. यांचे प्रमाण कधीं जास्त व कधी कमी असे. १९१६-१७ मध्ये जवळ जवळ ५४ कोटि रुपयांच्या हुंड्या विकल्या. १९१९/२० मध्ये ४७ कोटि रुपयांच्या हुंड्या विकल्या.
 महाबुद्धाच्या कालांत जवळ जवळ १२० कोटि नवीन रुपये टांकसाळीतून पाडल्यामुळे सुवर्णचलन निधि जवळ जवळ २५ कोटींनी वाढला. पूर्वीप्रमाणे रुप्याचा भाव असता तर एका रूप- यामागे ५ आणे प्रगणे एकंदर फायदा अदमासे ४० कोटि रुपये झाला असता. परंतु यांपैकी बरेचसे रुपये चांदी महाग असतांना पाडले होते व त्यांत नफा न होतां उलट किंचित् नुकसानच झाले. १९९६ मध्ये ४० कोटि; १९१७ मध्ये ४७ कोटि; १९१८ मध्ये ५२ कोटि याप्रमाणे या निधीची वृद्धि झाली आहे.महायुद्धा- तील टंचाईमुळे या निधीमध्ये रोख सोनें मुळींच नसून, सर्व सिक्युरिटीच आहेत.