पान:रुपया.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१६ )

झाली त्यामुळे १ रुपया = एक दशांश पौंडाचे सोने = एक नव- मांश पौंड अशा तऱ्हेचं प्रमाण बसले. एक रुपया दिला असतां २८/३० पेन्स मिळू लागले. उलटपक्षी हुंड्यांची किंमतही तित- कीच झाली. एक रुपया मिळण्याकरितां २० पेन्स द्यावे लागत.
 अशा कृत्रिम रीतीन हुंडणावळीस सरकारने आधार दिल्या- मुळे हुंडणावळ वर राहिली. परंतु वस्तुत: हिंदुस्थानास देणें नसून फक्त या दराचा फायदा घेण्याकरितां लोक डांत पैसे पाठवीत असल्याकारणानें, सरकारने उलट हुंडया विकण्याचे बंड केल्याबरोबर हुंडणावळ १९२० च्या अखेरीस खाली खाली जात चालली. याच वर्षा रुपें पुनः अकल्पित रीतीने स्वस्त झाल्याने ही रुपयाची फुगलेली किंमत पुनः पूर्वपदावर आली. ती हल्ली इतकी खाली गेली आहे की, १ रुपयास १५ पेन्स मिळतात. स्मिथ-. कमिटीचा, एक पौंडाबरोबर दहा रुपये हा दर निश्चित करण्याचा प्रयत्न विफल होऊन, पुनश्च हरिः ॐ हाणण्याचा प्रसंग आला आहे. आणखी २ वर्धेतरी हुंडणावळ स्थिर होईल किंवा नाही यावह वानवाच आहे. अशा तऱ्हेने महायुद्धाचे काही सुवर्ण- संलझ चलनाची वरीच तिरपीट उडाली. व्यूरोक्रेटिक राज्यपद्ध- तीचा दोष हा आहे की, आपण कर्तुमकर्तुमन्यथाकतु समर्थ आहों असे या पद्धतीतील अधिकान्यांस वाटते.
 सोन्या-रुप्याच्या भावास गवसणी घालण्याचें घाष्टर्च करण हे साहम सामान्य नाहीं. या साहसाचें वैयर्थ्य परवां नुकतेच हिंदु-