पान:रुपया.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(१८)

अपेक्षा नाहीं ; सुवर्णसंलग्नचलन हेच हिंदुस्थानांत जास्त फायदेशीर आहे. या कमिशनच्या मुख्य सूचना पुढे लिहिल्याप्रमाणे आहेत.

 ( १ ) रुपयाची हुंडणावळ स्थिर ठेवणे हे फार महत्वाचे आहे. ( २ ) याकरितां अमलात आणलेली घटना ही फौलर कमिटीच्या सूचनांचा अतिक्रम करते, पण यांत कांहीं वावगें नाहीं. ( ३ ) सोन्याचे नाणे चलनांत असणे हे इष्ट नाहीं व सोन्याची टांकसाळही नको आहे. ( ४ ) रुपये व नोटा हेच चलन चालू ठेवावें ; लोक मागतील ते चलन द्यावे, परंतु नोटा जास्त लोकप्रिय होतील असे करावे. ( ५ ) सोन्याचा निधि हुंडणावळीच्या कामास येईल इतका भरपूर असावा; याला मर्यादा असु नये. ( ६ ). दोन्ही निधींत १।। कोटि पौंड सोने जमल्यानंतर सर्व निधीचा अर्धा हिस्सा सोन्यांत ठेवावा. (७) हिंदुस्थानांत सुवर्णचलननिधीमध्ये रुपये मुळीच ठेवू नयेत. (८) सर्व निधि लंडन येथ ठेवावा. (९) वाटेल त्या वेळेस उलट कौन्सिलबले १ शि. ३.२१/३२ पेन्स या दराने विकण्याची हिंदुस्थानसरकारेन हमी घ्यावी. ( १० ) चलनी नोटांमध्ये २० कोटि नोटा, रुपये नसतांना सुद्धा सरकारच्या प्रॉमिसरी नोटांच्या आधारावर चलनांत आणाव्या; नंतर कांहीं कालाने सरकारजवळ असलेल्या नोटा व बाकी चलनांत असलेल्या नोटांचा भाग इतका रुपयांच्या आधारावर नसली तरी चालेल. चलनी नोटांच्या निधीमध्ये ज्या सिक्युरिटी