पान:रुपया.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१५ )

निर्यात मालावरचीं 'बिल्स' विकत घेण्यास येथील एक्सचेंज बँका नाखुष होत्या. कारण हीं बिलें विकत घेऊन इंग्लंडांत पाठविली असतां, तेथें जे पैसे जमा होतील, ते पुनः हिंदुस्थानांत पाठवि- ण्याचे वेळीं हुंडणावळ एक दोन पेन्सांनी वर गेली तर पुनः नुक- सान व्हावयाचें ; त्याचप्रमाणे स्टेट सेक्रेटरीच्या हुंड्या जास्त विकत घेऊन हिंदुस्थानांत रुपये जमा केले असतां, पुनः ते पैसे इंग्लं डांत पाठवितांना हुंडणावळ खाली गेली तर तिकडूनही नुकसान होणार. अशा पेचांत सांपडल्यामुळे बँकांचा व्यवहार बंद पडला व त्यामुळे निर्यात व आयात मालाची देवघेव करण्यास अडचण पडूं लागली. ही अडचण दूर करण्याकरितां, हुंड्या व उलट हुंड्या दोनही विकण्यास सरकारने सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, एका रुपयास २८पेन्स मिळण्याच्या आमिषानें व्यापाराच्या गरजेपेक्षाही जास्त उलट हुंड्या बँका घेऊं लागल्या. यामुळे हुंडणावळीचा दर आणखीच अस्थिर होऊन निव्वळ सट्टेबाजी सुरू झाली.
 १९२० च्या फेब्रुवारी महिन्यांत पौंड व डॉलर यांमधील हुंडणावळ पहिल्यापेक्षांही पौंडांच्या विरुद्ध झाल्यामुळे, रुपया व पौंड यांच्या हुंडणावळीवर त्याचा परिणाम झाला. एका रुपयाची किंमत, एका पौंडांत जितकें सोनें असतें त्याच्या अशी स्मिथ करन्सी कमिटीने ठरविली. परंतु सोन्याचा व पौंडांचा संबंध सुटून गेल्या मुळे एकदशांश सोन्याची किंमत एकदशांश पौंडापेक्षा जास्