पान:रुपया.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१४ )

 याच वेळी सोनें व रुपें हिंदुस्थानांत पाठविण्याची मोकळीक असती तर ही हुंडणावळ इतकी वर गेली नसती; परंतु सोनें व रुपे यांची आयात सरकारने कायद्यानें बंद केली होती. ही हुंडणावळ अधिक वर जाऊं न देण्याकरितां स्टेट सेक्रेटरीनें एक्स- चेंज बँकांच्या लंडन येथील मुख्य अधिका-यांजवळ असा ठराव केला होता की, १६÷पेन्सांपेक्षा जास्त पेन्स एका रुपयाऐवजी देऊ नयेत. राष्ट्राच्या दृष्टीने जास्त महत्वाचा जो निर्यात माल असेल, त्याच्या आधारावर काढलेली बिलें हीं प्रथम विकत घ्यावीं असाही या ठरावांत एक मुद्दा होता. १९१७ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ही व्यवस्था अमलांत आली; परंतु या वेळेस रुपें महाग झाल्यामुळे, हा दर टिकला नाहीं व १९१८ च्या एप्रिल महिन्यांत १८ पेन्स हा दर कायम करावा लागला. या आप- तीतून सुटण्याकरितां, सरकारनें, युनायटेड स्टेटस्मध्ये पुष्कळ रुपें खरेदी करून ते हिंदुस्थानांत पाठवून दिले. त्या रुप्याचे रुपये पाडून स्टेट सेक्रेटरीने हुंड्या विकल्यामुळे हुंडणावळणीच्या दरास आळा बसला.
 यानंतर कांही दिवसांनी रुप अधिक अधिकच महाग होत गेले. व त्यामुळे हुंडणावळीचा दर २० पेन्स, २२ पेन्स, २४ पेन्स, २८ पेन्स अशा क्रमानें चढत गेला. यामुळे व्यापारामध्ये अस्थि- स्ता उत्पन्न होऊन, कोणत्या वेळेस काय दर होईल याचा कोणासही अंदज करता येईना. अर्थात् इंग्लंडांतील बँकांवर काढलेली