पान:रुपया.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१३ )

वारंवार येऊं लागले; तथापि सामान्यतः पाहिले असतां, महा- युद्धाकरितां हिंदुस्थानांतील मालावर विशेषतः धान्यावर यूरोपांत इतकी मागणी होती की, एकंदर व्यापाराचा आढावा हिंदुस्थानच्या बाजूचा होता. आयात मालापेक्षां निर्यात बहुतेक जास्त असे व त्यामुळे हुंडणावळ नेहमी उच्च बिंदूवर असे.
 सर्व देशांतून रुप्याची मागणी आल्यामुळे, रुप्याचा भाव १२१८ नंतर फारच वर गेला. तो जातां जातां इतका वर गेला की, रुपयांतील धातूची किंमत त्याच्यापेक्षा जास्त झाली व रूप- याचा उपनाणे असण्याचा धर्म नाहींसा होऊन, तो पूर्ण किन- तीच्या नाण्याप्रमाणे झाला. त्यामुळे सरकारास रुपये पाडण्या- पासून फायदा न होतां, तोटा होऊ लागला. असे झाल्यामुळे १६ पेन्साला एक रुपया देण्याचे सरकारने बंद केले; कारण त्या रुपयाची खरी किंमत १८/२० पेन्स अशी झाल्यामुळे, प्रत्येक व्यापारी एका पौंडास पंधरा रुपये घेऊन त्याची चांदी सतरा रूप- यांस विकू लागला.ह्मणून स्टेट सेक्रेटरीनें हुंड्याचा भार १८ पेन्स प्रथम केला. त्यामुळे येथून पाठविलेल्या निर्यात मालावर नुकसान होऊं लागले. माल विकून जे पौंड येतील, त्यांचे रुपये १ = १५ या भावाने न मिळतां, १ = १३ या भावाने मिळू लागले. अर्थात् प्रत्येक पौंडामार्गे २ रुपयांला खोट येऊ लागली. असे झाल्याने सुवर्णसंलमचलनाची १ = १५ रुपये हा दर कायम ठेवण्याची जी प्रतिज्ञा होती, तिचा भंग झाला.