पान:रुपया.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१२ )

 १९१८-१९१९ मध्ये १४१ कोटींच्या चलनाच्या मानानें पौंड, सोने व रुपये मिळून धात्वात्मक निधि फक्त ६४ कोटी ६० लक्ष रुपये किंमतीचा होता ह्मणजे नोटांच्या अर्ध्यापेक्षाही १५६ कोटींनी कमी होता. ही स्थिति नेहमींच्या वेळी इष्ट नस- ल्यानें, नोटांचं चलन कमी करणे किंवा रुपये निधीमध्ये जास्त मरण असे दोनच मार्ग आहेत. या मार्गाचं अवलंबन सरकारने हलके हलकं केल्यामुळे आजमितीस नोटांच्या चलनाची स्थिति वरच्यापेक्षा जास्त समाधानकारक आहे. १९२१ चे सुरुवातीस एकंदर नोटांचे चलन १६४०७ लक्ष रुपयांचे होते. नोटांच्या निर्धीत ५२,३२ लक्ष रुपये व २४,०० लक्ष पौंड होते. ४,०० लक्षांचे रुपये टांकसाळीत नवीन पडत होते. सिक्यूरिटी हिंदु- स्थानांत ६८०० लक्षांच्या होत्या व इंग्लंडांत ८, ३५ लक्षांच्या होत्या.
 आतां रुपये व पौंड यांच्या हुंडणावळींत जी स्थित्यंतरे झाली त्वांचा विचार करूं. निर्यात माल आयात मालापेक्षा जास्त असला ह्मणजे हुंडणावळ वर जाते व आयात माल जास्त झाला मगजे हुंडणावळ खाली जाते हैं पूर्वी एका प्रकरणांत स्पष्ट केलेच आहे. हुंडणावळ खाली गेली झणजे लोकांस पौंडांची गरज जास्त भासते व त्यामुळे सरकारास इंग्लंडांतील सोन्यावर उलट हुंड्या काढाव्या लागतात.अशा रीतीचा प्रसंग पूर्वी फक्त १९०८ मध्ये आला होता; परंतु महायुद्धांत ही आपत्ति वारं- बार येऊ लागली. त्यांमुळे उलट हुड्या विकण्याचे प्रसंगही