पान:रुपया.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०९ )

३६५१ लक्षांच्या नोटा जास्त आल्या. ही सर्व मिळून एकंदर चन १३९८२ रुपयांच्या किंमतीने वाढले. १९१५ पर्यंत नवीन रुपये पाडण्याची विशेष जरूर भासली नाही; परंतु १९१६ व १९१७ या दोन सालांत मागणी अतिशय वाढली. १९१३ व १९१४ मध्ये नोटांच्या निर्धात रुपये येऊन चलनांतून कमी झाले, परंतु नंतर ह्या निर्धीतून पुष्कळ रुपये चलनांत परत आले. १९१८-१९१९ मध्ये लोकांजवळचे रुपये ४५ कोटींनी वाढले व १९१९-१९२० मध्ये लोकांजवळ आणखी २५ कोटी रुपये आले. पूर्वीच्या मानाने हिंदुस्थानांत पौंड फार कमी आले. कारण खाजगी निर्यात कायद्याने बंद केली होती. प्रथम नोटांचं चलन विशेष वाटले नाही; परंतु १९१५ पासून तं जोराने वाढू लागलें
 मार्ग नोटांच्या चलनाचे कोष्टक दिले आहे त्यावरून १९९६ चे पुढे चलन किती वाढत गेले ते दिसून येईल. १९१८ मध्ये २९१३ पेक्षां लोकांजवळचें नोटांचें चलन जवळ जवळ ३० कोटींनी वाढले. १९९७ मध्ये रुप महाग झाल्यामुळे, नवीन रुपये पाडणे फार खर्चाचें झालें याकरितां सरकारने एक रुपया व अडीच रुपये या दोन किंमतीच्या नोटा चलनांत आणल्या व त्यामुळे रुपयावरचा भर तितका कमी झाला. कांही ठिकाणी अविश्वासामुळे लोक नोटा घेण्यास नाखुष असत व त्यामुळे नोटांचे रुपये मिळण्यास बटाव द्यावा लागे; परंतु हा अविश्वास कमी