पान:रुपया.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९ वें.
महायुद्धाच्या कालांतील फेरबदल

 महायुद्धाचा पहिला परिणाम असा झाला की, जगांतील सर्व देशांतील चलनपद्धति व अन्तरराष्ट्रीय हुंडणावळ व बँकिंगला अवश्यक असा विश्वास अथवा पत हीं सर्व, एखाद्या झंझावातानें वृक्ष हालून जातो त्याप्रमाणे हालून गेली. प्रत्येक देश आपल्ला सो- न्याचा निधि एकत्र जमविण्याच्या उद्योगाला लागला व त्याप्रमाणें सोन्याच्या निधीवर निर्बंध घालण्यांत आले. कांहीं देशांत सोन्याचे नाणे चलनांतून काढून टाकून नोटांवर व चेकवर सर्व व्यवहार करूं लागले. लढाईकरितां शस्त्रास्त्रे उत्पन्न करण्याकडे वेळ व द्रव्य खर्च झाल्यामुळे, निर्यात मालाचें उत्पन्न कमी होऊन निर्यात व्यापार मंदावला. परंतु आयात बहुतेक देशांत नेहमीपेक्षाही जास्त वाढली; त्यामुळे नवीन सोने येण्याचं बंद होऊन आहे तेवढंच सोनें अपुरे होऊं लागले यामुळे व्यवहारांत नोटा दिल्या गेल्या. सोन्याचें नाणे मागण्याचा हक्क कायद्याने पुष्कळ देशांत काढून घ्यावा लागला. तथापि किंमती वाढल्यामुळे चलनां- विषयींची मागणी दुप्पट तिप्पट झाली. इंग्लंडांत महायुद्धाचे सुरवातीस ३॥ कोटी पौंडांच्या नोटा चलनांत होत्या त्या महा- युद्धाचे अखेरीस ३० पौंडापर्यंत गेल्या.