पान:रुपया.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०६ )

मध्ये करन्सीकमिटीपुढे लॉर्ड राथचाइल्ड यांनी व सर एडवर्ड हँजो यांनी अशाबद्दल एक योजना मांडली. या योजनेस हिंदु- स्थान सरकार व स्टेट सेक्रेटरी यांची सहानुभूति होती; तथापि असल्या मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजराचें प्रस्थ फार वाढेल व तो सर- 'काराससुद्धा प्रसंगविशेषी त्रासदायक होईल अशा अनेक कुशंका निघून, ती गोष्ट रहित झाली. अर्थशास्त्रज्ञामध्ये अशा बँकेच्या आवश्यकतेबद्दल एकव(क्यता होती व सर एडवर्ड होल्डन्सारख्या प्रख्यात तज्ज्ञाने १९१३ सालच्या कमेटीपुढे ही गोष्ट विशदपण मांडिली होती; पण हिंदुस्थानचे तत्कालीन फडणीस लॉर्ड सेस्टन यांनी ती गोष्ट अव्यवहार्य असे हलणून हाणून पाडली.सन १९१३-१४ च्या चेंबर्लेनकमिशननें मात्र या गोष्टीचा सरकारनं अवश्य विचार करावा अशी सल्ला दिली; तथापि पुढे बरेच दिव- सांनी १९२० चे सष्टंबरमध्ये इंपीरियल बँकेची स्थापना झाली. बरीच वर्षे पडलेल्या योजनेस लढाईच्या कालांतील कटु अनुभवा- मुळे कां होईना, मूर्तस्वरूप आले हे बरे झाले. या बँकेचे नियम बगैरेसंबंधी माहिती परिशिष्ट 'अ' मध्ये दिली आहे.