पान:रुपया.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(१५)

सोन्याची खुली टांकसाळ असावी; रुप्याचे नाणे फक्त सरकारने व्यापाराच्या स्थितीप्रमाणे पाडावें ; रुप्याच्या नाण्यांत जो फायदा होईल तो बाजूला ठेवून त्याचा सुवर्णनिधि बनवावा.

 या सूचनांस अनुसरून जे अॅक्ट पास झाले त्या वेळच्या भाषणांत फडणीस सर क्लिन्टन् डॉकिन्स यांनी लवकरच हिंदुस्थानांत रॉयल मिंटची एक शाखा उघडली जाईल असे जाहीर केले. ( या शाखेचे अद्यापपर्यंत नामपि न श्रूयते!) ही शाखा उघडण्याच्या विरुद्ध ‘ब्रिटिश ट्रेझरीने अनेक आक्षेप घेऊन गर्भावस्थेतच या बालकास ख्रिस्तलोकास पाठवून दिले. सरतेशेवटीं, हिंदुस्थान सरकारने निराश होऊन १९०२ मध्ये या शाखेची कल्पना सोडून दिली. ह्या वादांत लॉर्ड कर्झन यांचे मत हिंदुस्थानास अनुकूल होते हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.

 सोन्याची टांकसाळ जरी उघडली नाहीं, तरीही सरकारने लेखी जाहिरनामा काढून सॉव्हारन हे नाणे कायदेशीर फेडीचे चलन केले. हे पौंड अर्थात्च इंग्लंडहून व्यापाराच्या देवघेवींत यावयाचे. लोकांच्या व्यवहारांत पौंड जास्त देण्याकरिता सरकारने खुद्द आपल्या खजिन्यांतून काँट्रॅक्टर लोकांस व स्वतःचे नोकरांस शक्य तेवढे पौंड देण्यास सुरवात केली. अशा रीतीनें सोने व रुपें अशी दोनही तऱ्हेची नाणी सुरू झाली.

 यानंतर हिंदुस्थान सरकार हलके हलके फौलर कमिटीच्या सूचनांपासून च्युत होऊ लागले. याचे विस्तृत विवेचन पुढे योग्य