पान:रुपया.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०५ )

को आपरेटिव्ह बँक्स ( मध्यवर्ती सहकारी पेढ्या) स्थापन कर- ण्यांत आल्या. ( मध्यवर्ती पेढीनें लहानसहान खेड्यांतील पत- पेढ्यांना मदत करून देखरेख करणेची असते. ) याशिवाय रिसोर्स सोसायटीज अगर साधन- समीत्या, कन्झ्युमर्स सोसायटीज अगर उपभोग-समीत्या आणि प्रोड्युसर्स सोसायटीज अगर उत्पादक- समीत्या असे तीन भेद केले आहेत. यायोगे मध्यवर्ती बँकेचें काम सुलभ झाले आहे. यांचे १९२०-२१ सालाचे आंकडे पुढील- प्रमाणे आहेत. सर्व जातीच्या पेढ्यांची संख्या ४०७७२, सभासदांची संख्या १५, २१, १४८, सर्व पेढ्यांचें भांडवल, ठेवी वगैरे सर्व २१.४०,७०,००० मिळून रुपयांचे आहे.
 याप्रमाणे हिंदुस्थानांतील बँकांची रूपरेखा आहे. हळू हळू बँकांत पैसे गुंतविण्याची लोकांची प्रवृत्ति वाढत आहे. अशा वेळी सरकारकडून बँकांच्या स्थापनेस प्रोत्साहन मिळत गेल्यास, थोडक्याच कालांत सर्व हिंदुस्थानभर बँका पसरण्यास हरकत नाही.
 आतां स्टेट अथवा इंपीरिअल बँकेच्या स्थापनेसंबंधी थोडे लिहून हे प्रकरण पुरे करूं.
 तिन्ही प्रेसिडेन्सी बँकांची मिळून एक मध्यवर्ती बँक स्थापावी अशी सूचना मि० जी. डिक्सन यांनीं, १८६७ मध्ये जुनी मुंबई- बँक मोडल्यानंतर प्रथम मांडली; परंतु बंगाल बँकेचे बगैरे डाम- रेक्टर्स विरुद्ध असलेमुळे, ही सूचना पेंटाळली गेली. १८८९-
.