पान:रुपया.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०४ )

तात व हुंड्या खरेदी करितात. परदेशावरच्या हुंड्या खरेदी करण्यांत ते आपले पैसे गुंतवीत नाहीत. त्यामुळे बाजारांत ओढ पडून बँकांचे व्याजाचे दर वाढले तरी त्यांस एक दोन टक्के कमी व्याजानें पैसे देतां येतात. आतां, केव्हां केव्हां बँकांपेक्षाही हुं- ड्यांचा दर भारी असतो; पण असे प्रसंग क्वचित् !
 आतां राहिल्या सेव्हिंग बँका व कोऑपरेटिव्ह बँका.
 सरकारने प्रथमतः आपल्या देखरेखीखाली १८३३|३१चे दरम्यान कलकत्ता, मद्रास, मुंबई या तीन ठिकाणी बँका उघडल्या. पुढें १८७७ मध्ये जिल्हानिहाय सेव्हिंग बँका स्थापिल्या. नंतर पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग बँकांचे पद्धतीस १८८२ मध्ये सुर- वात झाली व त्यांनें १८९६ मध्ये सरकारी सेव्हिंग बॅकांचाही समावेश त्यांतच झाला. हल्लीं त्यांत पैसे ठेवणारांची संख्या १६ ॥ लाख आहे व सर्वांच्या मिळून सुमारे १९ कोटींच्या ठेवी आहेत. या बँकांचा विशेष उपयोग मध्यम प्रकारचा सुशिक्षित वर्गच मुख्यतः करून घेत असतो.
 शेतकरी लोकांचे उपयोगाकरितां [बँका] पेढ्या काढण्याची कल्पना १८८३ त प्रथम मुंबई सरकारने पुढे आणली.परंतु १९०४ पर्यंत तिला मूर्त स्वरूप आले नाहीं. लॉर्ड कर्झन यांचे कारकीर्दीत १९०४ साली सहकारी पतपेढ्यांचा कायदा पास झाला. १९१२ साली या कायद्याची व्याप्ति वाढविण्यांत आली व त्यामुळे एकंदरीत पेढ्यांची वाढ बरीच झाली. यायोगें सेन्ट्रल