पान:रुपया.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०३ )

असून जमा चाळीस लाख आहे. अशारीतीनें औद्योगिक बँका निघून त्यांनी नवीन धंद्यास उत्तेजन दिल्यास ते योग्य होईल व जाइन्ट स्टॉक बँकांवर अव्यापारेषु व्यापार करण्याचे प्रसंग कमी होतील.
 देशी संस्थानांतही अलीकडे बँका निघण्याचा स्तुत्य उपक्रम झाला आहे. बडोदा, द्वैसूर, मोरवी वगैरे संस्थानांत त्या त्या संस्थानिकांचे प्रोत्साहनामुळे बँका निघाल्या आहेत. यांपैकी 'बँक ऑफ बरोडा' हिची स्थितितर त्यांतल्या त्यांत अत्यंत वाखाणण्या- जोगी आहे. हिच्या शाखा मुंबई, अहमदाबाद, सुरत वगैरे शहरी असून तेथें या बँकेची पत मोठी आहे. सांगली संस्थानांत एक छोटीशी बँक अलीकडे स्थापन झाली आहे. [ निझाम ] हैद- राबाद, इंदोर वगैरे संस्थानांत इंपीरियल बँकेच्या शाखा आहेत हैं खरें. परंतु असल्या मोठमोठ्या संस्थानांत संस्थानिकांचे मदतीनें बँका स्थापन होणे हे त्यांस भूषणावह आहे व त्यांच्या प्रजेसही सुखाचें आहे.
 प्रेसिडेन्सी व एक्सचेंज बँका आणि जाइन्ट स्टॉक बँका व सराफ मारवाडी इत्यादि यांपैकी पहिल्या दोन्हीचा परदेशांशी मुख्य व्या- पार असल्यामुळे त्यांना युरोपियन व्यापारांचे अड्डे ह्मणतां येईल दुसन्या दोहींचा हिंदी व्यापाराशी मुख्यतः संबंध येत असल्यामुळे त्यांस हिंदी व्यापाराचे अड्डे असं ह्मणतां येईल. आतां सराफ, मारवाडी हे बहुधा हिंदुस्थानांतील अन्तर्गत व्यापारांत पैसा घाल-