पान:रुपया.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०२ )

तन्हेच्या बँकांस सरकारकडून मदत झालेली आहे. पण आमचे इकडे मात्र सरकार सहानुभूतीनें या प्रश्नाचा विचार करण्यापली- कडे कांहीं करीत नाहीं. ह्मणूनच इतर बँकांस उद्योगधंद्यांत पैसे घालणें बहुधा फायदेशीर नसतें औद्योगिक बँकेस मुख्य गोष्ट म्हणजे दीर्घकालीन मुदतीच्या ठेवी मिळाव्या लागतात, व पैसा कोठें गुंतविणेचा, कसा गुंतविणेचा याबद्दल बँकेच्या चालकांस स्वतः त्या धंद्यासंबंधीं पूर्ण माहिती असावी लागते. आपल्या इक- डील देशी बँकांनी असे प्रयत्न केले पण अनुभवाच्या व मदती- च्या अभावी त्यांचींच दिवाळी वाजली. हिंदुस्थानांत पहिली अशी औद्योगिक बँक ह्मणजे टाटा कंपनीने स्थापन केलेली 'टाटा इंडस्ट्रियल बँक' ही होय. (ही थोडासा एक्सचेंजचाहि व्यवहार करते.) हिची स्थापना १९१७ साली जाहली. त्यानंतर कल कत्ता येथें दुसऱ्या दोन औद्योगिक बँका निघाल्या आहेत.एक कलकत्ता इंडस्ट्रियल बँक व दुसरी सर टॉमस हॉलंड ( दारूगोळा खात्याचा खटला) यांचेयोगे प्रसिद्धीस आलेली कर्नानी बॅक. त्याच- प्रमाणे सूर संस्थानांतही एक 'मायसोर इंडस्ट्रियल बँक' या गांवाची औद्योगिक बँक निघाली आहे व नवीन औद्योगिक बँकाहि हृळू हळूं उत्पन्न होत आहेत. 'इंडस्ट्रियल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया लिमिटेड' या नांवाची एक बँक अहमदाबाद येथें पुरुषो- त्तमदास, मंगळदास बगैरे प्रमुख हिंदी व्यापायांच्या प्रयत्नाने स्थापन झाली आहे. तिचें संकल्पित भांडवल सव्वासहा कोटीचे