पान:रुपया.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(१४)

त्यामुळे १:१५ या प्रमाणाच्या वर हुंडणावळ जात नसे. या कमिटीपुढे जी मते मांडली गेली त्यांत दोन पक्ष होते. एका वृक्षाचे म्हणणे असे होते की, पूर्वीचीच पद्धति उत्तम असुन रुपयाला कृत्रिम किंमत देणे घातक आहे; असे केल्याने प्रजेचे नुकसान होईल; कारण लोकांना जास्त किंमतीच्या रुपयांत कर द्यावे लागतील. हुंडणावळीच्या अस्थिरतेसंबंधाने या पक्षाचे म्हणणे असे होतें कीं, काटकसर करून व नवीन कर्ज पौंडांत न काढतां, रुपयांत काढून हा प्रश्न सोडविता येईल. व्यापाऱ्यांचेही मत या पक्षाच्या वतीने होते. कारण, रुपयाच्या अवनतीने व्यापाराचा फायदा होता. इंग्लंडांत मालाला पौंड तितकेच मिळून त्याचे रुपये हिंदुस्थानांत जास्त मिळत. दुसऱ्या पक्षाचे म्हणणे असे होते की, हुंडणावळ वारंवार बदलणे ही फार अनिष्ट गोष्ट आहे. तेवढ्यापुरता व्यापारास थोडा फायदा झाला तरी एकंदर व्यापारास अस्थिरतेने प्रतिबंध होतो. शिवाय होम चार्जेसकरितां जास्त पैसे द्यावे लागतात त्यामुळे सरकारची त्रेधा होऊन लोकांसही करांचे प्रमाण जास्त द्यावे लागते.

 दोन्ही पक्षांची साधकबाधक प्रमाणे ऐकून व त्यांतील सार काढून अखेर फौलर कमिटीने नवीन पद्धति अमलात आणण्याच्या बाजूने निकाल दिला. या कमिटीच्या सूचना पुढीलप्रमाने होत्या. सोन्याचे चलन अस्तित्वात आणावे व सोन्याचे नाणेही पाडावे; पौंड व रुपया यांमधील प्रमाण १:१५ असे निश्चित करावे;