पान:रुपया.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९२ )

 वरील कोष्टकावरून एक गोष्ट लक्षांत येते की, ठेवीची रकम सारखी वाढत होती परंतु त्या मानाने हिंदुस्थान तील रोख शिल्लक मात्र दिवसेंदिवस वाढण्याऐवजी कमी होत होती. हैं अत्यंत धातुक होते; परंतु १९१६-१७ मध्ये ही स्थिति पालटली आहे असे रोख शिलकेचें प्रमाण पाहिल्यास दिसून येईल. ही एकंदर शिल्लक कमी ठेवतांना, एक्सचेंज बँकांची खात्री असते की, जर हिंदुस्थानांतील सांपत्तिक परिस्थितीत कांही अडचणीचा प्रसंग उद्भवला व पैशाची जरूर लागली, तर लंडनमध्यें पैसे अरून टी. टी. नें ताडतोब हिंदुस्थानांतील ठेवी परत देतां येतील. ह्मणून ते एकंदर ठेवीपैकी शेकडा १८ ते २० या प्रमाणांत रोख शिल्लक प्रसंगांकरितां ह्मणून राखून ठेवितात पण हिंदुस्थाना- 'सारख्या बँकींगच्या तत्वाचा विशेष फैलाव में झालेल्या देशांत, इतकी कमी शिल्लक ठेवणे जरा धोक्याचेंच आहे. आतां इंग्लंड- मधील गोष्ट निराळी आहे. तेथे आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, शेकडा २० पर्यंत रोख शिल्लक बँकेत असली तरी चालते; पण हिंदुस्थानांत व लंडनमध्ये एकाच वेळी जर पैशाची ओढ बसली, तर हिंदुस्थानांत पैसा परत करणे या एक्सचेंज बँकांना फार कठिण जाईल व त्यामुळे यांची स्थिति फार वाईट होईल. बरीच वर्षे विशेष त्रासाशिवाय व संकटाशिवाय लोटल्या- मुळे, आपत्कालाविषयींच्या कल्पना या बँकांच्या लक्षांत येईनाशा झाल्या आहेत.