पान:रुपया.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९३ )

 आतां वर सांगितल्याप्रमाणे इंग्लंडमध्ये हिंदुस्थानापेक्षा जरी कमी शिल्लक चालते; तथापि वस्तुस्थिति मात्र तशी नाहीं हूँ लक्षांत ठेविले पाहिजे. लंडनमधील एक्सचेंज बँकांची देणी व जमा पाहिली असतां, त्यांची स्थिति पुष्कळ चांगली असल्याचे आढळून येतें. कारण लंडनमध्यें वठविल्या जाणाच्या खाजगी हुंड्यांची संख्याच त्यांच्या जवळच्या ऐवजांत एकंदरीनें जास्त असते व या हुड्य ना रोख ऐवजाप्रमाणे समजण्यास हरकत नाहीं. महायुद्धापासून हिंदुस्थानाबाहेरील यांच्या व्यापारांत ठेवीवरील रोख शिल्लकेचें प्रमाण पुष्कळच वाढले आहे.
 एकंदरींत पाहतां, एक्सचेंज बँकांना भीतीचें विशेष कारण नाहीं. फक्त हिंदुस्थानांतील ठेवी जास्त घेतल्यास, हिंदुस्थानां तील शाखांत त्या मानानेंच रोखशिलकेची वाढ होत असली पाहिजे ह्मणजे झालें. ठेवी वाढू देणें व रोखशिल्लक कमी कमी करीत जाणे ह्या मार्गाने मात्र संकट केव्हां उत्पन्न होईल याचा नियम नाहीं व याविषयीं अतिशय सावधगिरी राखली पाहिजे.
 हिंदुस्थानांत पहिली जॉईन्ट स्टॉक बँक अलेक्झॅन्डर कंपनीने कलकत्ता येथें सन १७७० मध्ये काढिली.या बँकेनें आपल्या चलनी नोटादेखील काढिल्या होत्या पण त्या कलकत्ता व त्याच्या आसपास फक्त चालत असत कारण सरकारने त्यांचा स्वीकार तिजोग्यांवर करणेचें नाकारलें होतें. ही बँक १८३३ च्या सुमारास