पान:रुपया.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२० )

स्थान स ही परावलंबी पद्धति विघातक आहे. कारण हिंदी व्यापा- रांत गुंतविले जाणारे हे पैसे लंडनस रख्या अतिशय दूर अस णान्या एका ठिकाणाहून थोड्या मुदतीच्या ठेवींतून आणिले जातात व एखाद्या वेळी ठराविक मुदतीत व्यापार होऊन पैसे मोकळे न झाल्यास, ते पैसे केव्हां परत मागितले जातील याचा भरंवसा नसल्यामुळे, तिकडे गरंज लागल्यास पैसे देणें कठिण पडेल न दिल्यास हुंड्या विकत घेण्याची या बँकांची शक्ति कमी होऊन हिंदी निर्यात व्यापारास द्रव्यसाहाय्य करण्यास प्रतिबंध होईल ! तेव्हां थोड्या मुदतीच्या ठेवी, मग त्या हिंदुस्थानांतील असोत किंवा लंडनमधील असोत, त्या त्या ठिकाणच्या नेहमींच्या रोख ऐवजा- पेक्षा जास्त रकमेच्या घेऊं नयेत असा नियम असावा ह्मणजे भीति सहणार नाही. त्याचप्रमाणें हिंदी एक्सचेंज बँकांच्या लंडन- मधील शार्खेतल्या ठेवी, त्यांच्या तेथील थोड्या मुदतीच्या कर्जाऊ स्कमा, त्यांची तेथील शिल्लक, त्याचप्रमाणे त्यांच्या लंडन येथे स्वीकारलेल्या हुंड्या व ताबडतोब विकले जाणारें तारण, यांच्या बेरजेच्या रकमेपेक्षां अधिक असूं नयेत. तसेंच हिंदुस्थानांतील थोडक्या मुदतीच्या ठेवी व इतर कर्ज ही त्यांची रोख शि- लक व सहज वसूल होणारा ऐवज यांच्या रकमेपेक्षां अधिक नसावीं. आतां हिंदुस्थानांत विकली गेलेली पण लंडनवर काढ- लेलीं बिलें हीं विलायती भांडवलांत कां हिंदी भांडवलांत अंतर्गत करावीं असा प्रश्न उपस्थित होतो; पण ज्याअर्थी त्या हुंड्यांचे