पान:रुपया.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८९ )

हिंदुस्थानांतील निर्यात व्यापारावर अवलंबून असते.हिंदु- स्थानांत खरेदी करूं लागल्याबरोबर लागलीच ह्या बँका लंडन- मध्यें हुंड्या खरेदी करून, पैसे जरुरीप्रमाणे तारेनेंसुद्धां (टी. टी. नें) इकडे हिंदुस्थान सरकारमार्फत आपल्या शाखांस पाठवि- तात व पुनः खरेदी होते. अशा रीतीनं हें रहाटगाडगे फिरत असतं.
 आतां, टी. टी. ची [ तारेची ] व्यवस्था नाहींशीं करून, हिंदु- स्थानसरकारमार्फत पैसे पुरविण्याचे जर स्टेट सेक्रेटरीने नाकारले आणि सोनें किंवा पौंड पाहिजे तर बँकांनी पाठवावेत असे ठरविलें, तर त्याच्यायोगानें व्यापार जोराने चालणार नाहीं. पौंड येथील शाखांत पाठविल्यास बराच खर्च होईल. शिवाय वाटेंत दिवस लागतील, तितक्या दिवसांचें त्या रकमेचे व्याज बुडेल आणि एखाद्या वर्षी जर हिंदुस्थानांत दुष्काळ पडला, तर हिंदुस्थानांतून निर्यात कमी होईल. अर्थात् एक्सपोर्ट बिलांची मागणीही कमी होऊन, त्यायोगे हुंड्या विकल्या जाणार नाहीत. असे झाल्यास होमचार्जील् कशानें भागणार? अशा तऱ्हेनें हुंड्यांचें समर्थन केले जाते. या सर्व घडामोडीला लागणारा पैसा बँकांनी हिंदुस्थानांत मिळालेल्या ठेवीतून घेतलेला असो अगर विलायतेंत मिळा- लेल्या ठेवींतून घेतलेला असो, लंडन येथील बाजारच्या देव- घेवीच्या दृष्टीने या दोन्हींचाही उपयोग सारखाच आहे; पण याचा हिंदुस्थानच्या व्यापाराच्या दृष्टीने विचार केल्यास, हिंदु-