पान:रुपया.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण २ रें.
सुवर्णसंलग्न चलन.
( Gold Exchange standard. )

 खुली टांकसाळ बंद केल्यानंतर व रुपयाचा भाव पौंडांत १६ पेन्स असा ठरविल्यानंतर, नवीन युगास सुरवात झाली. प्रथम रूपयाचा भाव इतका खालीं ह्येता की, कायद्यामध्ये रुपयाची किंमत १६ पेन्स असूनही खरोखरीच्या व्यवहारांत १२।१३ पेन्स होती व कधी कधी १२ पेन्सांपेक्षांही खालीं जाई. प्रथम सरकारने नवीन रुपये पाडण्याचे बंद करून, रूपयाची किंमत कृत्रिम रीतीने वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु हुंडणावळ १६ पेन्सांवर येईना. हिंदुस्थान सरकारास आपण केलें हैं बरोबर केले किंवा नाही असा संशय येऊ लागला. खुली टांकसाळ बंद केल्यामुळे कांहीं व्यापारीही असंतुष्ट झाले. अशी स्थिति १८९८ पर्यंत चालली. त्या साली तीच पद्धति अमलात आणण्याचे ठरून स्टेट सेक्रेटरी यांनी पुन्हां सर्व धोरण व्यवस्थित स्वरूपांत आणण्याकरितां फौलर कमिटी नेमिली. १८९८ मध्ये सोन्याचे नाणे सरकार आपल्या करामध्ये घेत असे, परंतु लोकांच्या व्यवहारांत तें कायदेशीर नव्हते. सोने किंवा सॉव्हारिन दिल्यास रुपये मिळत.