पान:रुपया.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८६ )

फ्रेंच, जपान, जर्मन, अमेरिका आणि रशिया या देशांतील व्यापा- यांच्या प्रतिनिधिभूत आहेत. यांचा हिंदुस्थानांत व्यापार किती होतो व बाहेर किती होतो याचे आंकडे उपलब्ध नाहीत; परंतु यांच्या एकंदर व्यापारांत हिंदुस्थानांत यांचा शेकडा दहा बारा टक्कयांपेक्षा जास्त व्यापार नसावा असे तज्ज्ञांचे मत आहे.
 तेव्हां वरील एकंदर विवेचनावरून लक्षांत येईल कीं, लंडन- मध्ये ज्यांची ऑफिस असून हिंदी व्यापाराची सूत्रे ज्यांच्या हातांत आहेत अशा एकंदर बँका फार थोड्या आहेत. या बँकां- जबळ भरपूर पैसा शिल्लक असल्यामुळे यांची पत फार मोठी आहे व एकंदर स्थितीही उत्तम आहे. आतां यांचा हिंदुस्थानांतील व्यापार कोणत्या पद्धतीने चालतो त्याविषयी विवेचन करूं. त्याचा आपल्या प्रस्तुत विषयाशी संबंध आहे. त्यांचे, हुंड्याशिवाय इतर व्यवहार साध्या बँकांप्रमाणेच चालत असतात, तेव्हां त्यांबद्दल लिहिण्याचे कारण नाही.
 आतां एवढे मोठे व्यवहार चालण्यास या बँकांजवळ पैसा कोणकोणत्या मार्गांनीं येतो ते पाहू. पूर्वी सांगितल्याप्रमाणे यांचे- जवळ यांचें मुख्य भांडवल व नफा व टला जाऊन नियमाप्रमाणे राहिलेली शिल्लकही असतेच; पण याशिवाय इतर बँकांप्रमाणे यांचेजवळ मुदतीच्या ठेवी व त्याचप्रमाणे चालू खात्यावरील ठेवी असतात. ह्या ठेवी त्यांस लंडनमध्ये अगर हिंदुस्थानांत दोन्हीं ठिकाणीं मिळतात. त्यांतही त्यांचा प्रयत्न लंडनमधल्या ऑफि