पान:रुपया.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८५ )

गेली नाही. यांतील दिल्ली आणि लंडन बँक ( ही अलायन्स बँक ऑफ सिमला इच्यांत १९१६ मध्ये सामील झाली. ) जरी सर्वांत जुनी असली तथापि तिची प्रगति आतांपर्यंत विशेष ह्मणण्यासारखी झालेली नव्हती. ईस्टर्न बँकचे व्यवहार मात्र जोरांत आहेत व तिला हिंदुस्थानांत बरेंच मोठे महत्व प्राप्त होईल असे वाटते. [ मेसर्स कॉक्स आणि कंपनीच्या बँकेचा व्यवहार अद्याप फार जोरांत नाहीं.] या बँकांचे शेअर्सचे भावांत शेकडा २०० किंवा त्यापेक्षा अधिक पटीनी वाढ झालेली आहे. परंतु यावरून नवीन एक्सचेंज बँका स्थापन केल्या तर त्या फायदेशीर होतीलच असे ह्मणतां येणार नाहीं. कारण हल्लीं अस्तित्वात अस लेल्या बँकांनीच सर्व बाजूंनीं व्यापार वेढून टाकलेला आहे. तेव्हां या किंवा लंडन अथवा पॉरस सारख्या मोठ्या शहरांतील अशा प्रकारच्या दुसन्या व्यापारी पेढ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय नवीन एक्सचेंज बँक यशस्वी होणार नाहीं.
 आतां हिंदुस्थानाबाहेर ज्यांची मुख्य ऑफिसें आहेत त्या बँकांविषयी विचार करूं. या बँका एकदर पांच आहेत. कास्तार नॉस्यनल देस्काम्प्त दपारी; १८८९. [हिला आपण सोईकरितां पॅरीस बँक ह्मणूं]. याकोहामा स्पिसी बँक. १८८०; ड्यूश एशियाटिक बँक (महायुद्धापासून लिक्विडेशनमध्ये गेली आहे); इन्टरनॅशनल बँकिंग कार्पोरेशन १९०१ आणि रसो एशियाटिक बँक, १९१०; [या बँकेचे संबंधी हल्लीं विशेषशी माहिती नाहीं.] या अनुक्रमें