पान:रुपया.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८७ )

सांत ( याचे कारण पुढे कळेल. ) ठेवी जास्त मिळविण्याचा असतो. याकरितां इतर बँकांपेक्षां या बँकांत ठेवीवर जास्त सवलती असतात. वर्षाच्या किंवा त्याहून जास्त मुदतीच्या ठेवीवर शेंकडा चार किंवा केव्हां केव्हां त्याहूनही अधिक व चालू खात्याच्या ठेवीवर महिनाअखेरीस जी रकम शिल्लक राहील, त्यावर शेंकडा दोन टक्केप्रमाणें व्याज नियमाप्रमाणे रोख देतात; हल्लीं महा- युद्धापासून हे दर १/२ टकांनी जास्त वाढत आहेत.अशा रीतीने मिळालेल्या ठेवी शिवाय मूळ भांडवल व शिलकेपैकी रकम ही सर्व त्यांच्या एकंदर व्यवहाराचा आधार होत. पैकी बँकेच्या नियमाप्रमाणें व अनुभवाप्रमाणे जरूरीकरितां लाग- णारी रकम तेवढी रोख शिल्लक ठेऊन थोडीशी रकम हिंदुस्थानांत अगर हिंदुस्थानाबाहेर कर्जाऊ देतात. बाकीची थोडी रकम हुंड्या खरेदी करण्यांत गुंतवितात यापैकी कांहीं हुंड्या हिंदु- स्थानावर काढिलेल्या असतात व त्या लंडनमध्ये विकल्या जातात; परंतु लंडनवर काढलेल्या व हिंदुस्थानांत विकल्या जाणाऱ्या हुंड्यांची संख्या जास्त असते. मुदतीच्या ज्या व्यापारी हुंड्या असतात, त्या मुदत पूर्ण होईपर्यंत बहुतेक बँका पुढे ठेवीत नाहीन. हिंदुस्थानांतील व्यापाऱ्यांच्या ज्या मुदतीच्या हुंड्या लंडन येथील व्यापाऱ्यांवर काढलेल्या असतात, त्या हुंड्यांची मुदत पूर्ण होईपर्यंत एक्सचेंज बँका वाट पहात नाहीत. फक्त तितक्या मुदतीचं व्याज कापून घेऊन हिंदुस्थानांत विकत घेतात व त्या