पान:रुपया.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८४ )

आतां आपण एक्सचेंज बँकांकडे वळं. एक्सचेंज बँकांचे दोन विभाग आहेत. (१) ज्यांची मुख्य ऑफिसें हिंदुस्थानचे बाहेर आहेत अशा ; (२) ज्यांची मुख्य ऑफिसें हिंदुस्थानांत आहेत अशा. यांतही पुनः पोटभेद करितां येतील, ते असे-ज्या बँकां- चा दिंदुस्थानांत फार मोठा व्यवहार चालतो त्या व हिंदुस्थाना- बाहेर जास्त व्यवहार चालत असून हिंदुस्थानांत फक्त लहन सहान शाखा आहेत अशा
 हिंदुस्थानांतच जास्त व्यापार होतो अशा बँका खालीलप्रमाणें आहेतः– दिल्ली आणि लंडन बँक ( स्थापना १८४४ ); चार्टर्ड बँक ऑफ इंडिया, आस्ट्रेलिया अॅण्ड चायना स्थापना १८५३); नॅशनल बँक ऑफ इंडिया (स्थापना १८६३); हाँगकाँग अॅण्ड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन [ स्थापना १८६५); मर्कन्टाईल बँक ऑफ इंडिया (स्थापना १८९३; ईस्टर्न बँक स्थापना १९१०!, मेसर्स कॉक्स आणि कंपनीची बँक [स्थापना १९०९]. आतां यां- तील चार्टर्ड आणि हाँगकाँग या दोन बँकांचा सर्व प्राच्य देशांत विशेषतः चीनमध्ये वगैरे जास्त व्यवहार होत असतो, तरी हिंदु- स्थानांत सुद्धां त्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात. बाकीच्या राहिलेल्या चार ह्या मुख्यतः हिंदी आहेत, असे ह्मण- ण्यास हरकत नाही. यांत एक लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ह्मणजे हल्लीं अस्तित्वांत असलेल्या या बँकांपैकी एक सुद्धां नवी अशी बँक सन १८६४ ते १९०९ च्या मधल्या काळांत स्थापिली