पान:रुपया.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८३ )

खजिन्याची स्थापना केली व त्या वेळेपासून सरकारी शिलकेचा कांही ठराविक भाग बँकांस देतात
 प्रेसिडेन्सी बँकांची त्यांच्या स्थापनेपासून तो आतांपर्यंतची कामगिरी खरोखर मोठी आहे. कारण या कालांत दहा पांच वेळां तरी असे प्रसंग आले होते की, त्यावेळी कित्येक बँका बुडाल्या. तर कित्येक डबघाईस आल्या; परंतु या बँका मात्र तशा प्रसंगांतून मोठ्या शिताफीनें बचावल्या. यांच्यावर त्या त्या प्रांतांतील इतर बँकांचा इतका विश्वास आहे की, त्या बँका आपल्या शिलका किंवा ठेवी या बँकांतच ठेविात. ह्मणजे या बँका इतर बँकांचा आधारस्तंभ आहेत असे ह्मणण्यास हरकत नाहीं. या बँकांची स्थिति हल्ली इतकी उत्तम आहे की, त्यांच्या शिलकीची रक्कम जवळ जवळ त्यांच्या भांडवलाइतकी झाली आहे. आणि त्यांच्या (शेअर्सची ) भागांची किंमत मूळ किंमतीच्या तिपटीवर गेली आहे. या बँकांनी आपापल्या प्रांतांत आपल्या शाखा काढल्या आहेत. बंगालच्या बँकेच्या १९.९ पर्यंत २६ शाखा होत्या व मुंबई व मद्रासच्या अनुक्रमे ८ व २६ अशा शाखा होत्या. इंपीरियल बँकेच्या स्थापनेळासून आतां सर्व शाखांची मिळून ८५ पर्यंत संख्या गेली आहे. बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ बॉम्बे व बँक ऑफ मद्रास या तीन्ही बँकांचे भांडवल अनुक्रमें २ कोटी, १ कोटी, व ७९ लक्ष येणेप्रमाणे आहे. शिवाय शाखांचा प्रसार व्हावा ह्मणून सरकारनें कांहीं वर्षे शाखांपुरतें लागणारें भांडवल बिन व्याजी देणेचें कबूल केले आहे.