पान:रुपया.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८२ )

रीतीनें पैसे भलत्या ठिकाणी गुंतविण्याचा अव्यापारेषु व्यापार अगोदर केलाच कशाला ? ) ( ५१ दोन किंवा अधिक सह्या अस लेल्या प्रॉमिसरी नोट्सवर पैसे द्यावेत. ( ६ ) कोणत्याही इस- मास एकमेकांशीं कांही संबंध नसलेल्या व्यापायांच्या व्यक्तिशः पतीवर पैसे देऊं नयेत. ( ७ ) ज्या मालावर पैसे दिले जातील तोच माल बँकेच्या स्वाधीन तारण ह्मणून केला पाहिजे.
 आतां यांतसुद्धां नियम पांचप्रमाणे बँकेच्या मनांत पैसे देण्याचें असेल तर तिला सवड काढितां येईल. कारण कोणत्याही दोन स्वतंत्र गृहस्थांच्या सह्या मिळविल्या तरी, रकम किती जास्ती कमी द्यावी हे बँकेस त्या सह्यांची जेवढी पत वाटेल त्यावर अव- लंबून राहील. त्याचप्रमाणे नियम सातप्रमाणे बँकेच्या ताब्यांत तारण ह्मणून दिल्या जाणाऱ्या मालाची किंमत कमी जस्त मानणे हंडी बँकेच्या मर्जीवरच बहुतांशी राहील.
 या अटी जरी घातल्या असल्या, तरी कांहीं सवलतीही सर- काराने दिल्या आहेत त्या अशाः -
 सरकारच्या खजिन्यांतील शिलकेपैकी काही विशिष्ट भाग बँकेस चिनव्याजी देण्यांत येईल. १८६२ नंतर ते ८७६ पर्यंत जवळ जवळ खजिन्यांतील सर्वच शिल्लक या बँकांत | बिन व्याजी ] ठेवण्यांत येत असे; परंतु एकदां सरकारास पैशाची जरूर असतां, यांना सरकारची शिल्लक वेळेवर सरकारास परत करितां आली नाहीं, ह्मणून सरकारने १८७६ मध्ये रिझर्व्ह
.