पान:रुपया.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८१ )

या बँकावर अटी घातल्या आहेत, तथापि त्यांस सवलतीही दिल्या आहेत. यांतील मुख्य अटी खालीलप्रमाणे आहेत:-
 ( १ ) सदरहू बँकांनी हिंदुस्थानाबाहेर पैसा भरावा लागेल अशा प्रकारें कोणताही देवघेवीचा, खरेदी विक्रीचा किंवा विनि- मयपत्रांचा व्यवहार करूं नये. या नियमान्वयें हिंदुस्थानाबाहेर एक्सचेंजचा व्यापार या बँकांना करितां येत नाही. ( २ ) त्यांनी हिंदुस्थानाबाहेर कर्ज काढावयाचें नाही किंवा हिंदुस्थाना- बाहेरील ठेवी स्वीकारणेच्या नाहींत. त्याचप्रमाणे अन्य तऱ्हेनें शाखा किंवा एजंट ठेऊनही वरील देवघेवी हिंदुस्थानाबाहेर त्यांनीं करणेच्या नाहींत किंवा शावा वगैरेकरितां लंडनमध्ये भांडवल जमविणेचें नाहीं. ( ३ ) त्यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त भुद- तीने कर्ज देऊं नये. ( ४ ) किंवा गहाणावर अगर स्थावर इस्टेटीवर पैसा देऊ नये. ( हा नियम विशेषत: आपल्या इक- डील बँकांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. बँकेच्या मुख्य हेतू- प्रमाणं पैसा व्यापाराच्या उपयोगाकरितां खेळतां राहिला पाहिजे. स्थावर इस्टेटीवर पैसा जर दोन दोन चार चार वर्षे अडकून पड़ला, तर बँकांनी काम करावयाचें तरी काय? किंवा त्यांचा उपयोग तरी काय? मागें बँका बुडण्याच्या सपाट्यांत जेव्हां लोक आपापल्या ठेवी काढून घेऊं लागले, व पैसे कमी पडूं लागले, तेव्हां आमचे कित्येक डायरेक्टर, मॅनेजर गिरण्याकडे बगैरे बोट दाखवूं लागले. बँकांच्या मूळ उद्देशांविरुद्ध अशा