पान:रुपया.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७९ )

बाडी इत्यादि. शिवाय सहकारी पतपेढ्या व पोस्टाच्या बचत- पेढ्य। सेव्हिंग बँका · यांना जॉइन्ट स्टॉक बँकांचे पुरवणीवजा विभाग मानण्यास हरकत नाहीं.
 प्रेसिडेन्सी बँका - हिंदुस्थानांतील पहिली प्रेसिडेन्सी बँक चंगालमध्यें सन १८०६ साली ' बँक ऑफ बेंगाल' या नांवानें स्थापिली गेली. कंपनीसरकारचा ताबा या कालीं सर्व हिंदु- स्थानावर होता तथापि बंगाल प्रांत हा कंपनीच्या ताब्यांत जाऊन पुष्कळच वर्षे आतांपर्यंत लोटली होती. शिवाय नीळ, ताग यांची लगवड व व्य पार करणाऱ्या पुष्कळ युरोपियन कंपन्यांनी आतांपर्यंत कलकत्ता, मिर्झापूर वगैरे ठिकाणी खासगी व सामाईक पद्धतीवर बँका काढल्या होत्या व ह्मणूनच चंगाल प्रांतात पहिली प्रेसिडे सी बँक स्थापन झाली सन १८०९ साली कंपनीसरकार- कडून तिलए सनद मिळाली. पुढे सरकारकडून सनंदा मिळून सन् १८४० मध्ये मुंबईस व १८४३ मध्ये मद्रासेस याप्रमाणे दोन प्रेसिडेन्सी बँका स्थापन झाल्या. आतां या प्रेसिडेन्सी बैंका जरी युरोपिअन व्यापारी लोकांच्या प्रयत्नामुळे व मुख्यतः त्यांच्याच भांडवलावर स्थापन झाल्या आहेत; तथापि त्यांचा चराचसा कारभार सरकार नियंत्रणाखाली चालत असल्यामुळे, त्या सरकारी बँका ह्मणूनच व्यवहारांत समजल्या जातात. ईस्ट इंडिया कंप नीच्या डायरेक्टरांना, या बँका व्यापारांत आपले तट्टं पुढें सारतील अशी भीति वाटल्यामुळे, ( या बँका युरोपियन भांडवलावर मु