पान:रुपया.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७८ )

पाहिजे. बरीच वर्षे गाजत असलेल्या इम्पीरियल बँकचे कल्पनेस लढाईंतील कटु अनुभवानंतर सरकारने १९२० मध्ये मूर्त स्वरूप दिले आहे. संकल्पित हेतूप्रमाणे जर तिच्याकडून कार्य घडून आलें तरी पुष्कळच झाले असे ह्मणतां येईल. असो.
 आतां बँकांचें कार्य काय व त्यांचे प्रकार किती ते पाहू.. बँकेचें कार्य ह्यणजे, लोकांच्या ठेवी ठेवणें, व्याजाने लोकांस पैसे देणे, चलनी नेटा काढणें, चैक, बिलें इत्यादि बटविणें, हुंडीचा व्यापार करणे वगैरे. याशिवाय व्यापायांचे खास उपयोगाकरतां असणाऱ्या कमर्शियल बँका; गहाणाचा व्यवहार करणाऱ्या मार्ट- गेज् बँका, औद्योगिक बँका ( इंडस्ट्रियल बँक्स ), शेतकन्यास मदत करणाऱ्या सहकारी पतपेढ्या इत्यादि अनेक प्रकारच्या बँकांचा या यादीत समावेश करितां येईल.
 परंतु वर दिलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या सर्व बँकांसंबंधी येथें विचार करण्याचे कारण नाहीं फक्त हिंदुस्थानांतील चलन- पद्धतीवर ज्यांचा प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे विशेष परिणाम होतो. त्यांचा येथें विचार करणेचा आहे. या दृष्टीने बँकांचे एकंदर चार विभाग पडतात. .१ प्रेसिडेन्सी अथवा सरकारी बँका; (आतां इम्पिरियल बँक ).२ एक्सचेंज बँका. ३ जॉईन्ट स्टॉक बँका (समाईक भांडवलाच्या बँका.यांतच इंड- स्ट्रियल बँकांचा समावेश होतो. ४ खासगी असणारे किंवा पेढीच्या पद्धतीवर खासगी तऱ्हेनें देवघेव करणारे सराफ, मार-