पान:रुपया.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( १७७ )

किंबहुना देशांतील सर्व अंतर्व्यापार त्यांचे ताव्यांतच आहे असे अटलें तरी चालेल. यामुळेही एकप्रकार बँकांचे प्रसारास थोडासा अडथळा होतो; परंतु जर्मनी, जपान, इंग्लंड वगैरे देशांत उद्योग- धंद्याचे मदतीकरितां बँकांस विशेष सवलती व आर्थिक सहाय्य देऊन तेथील सरकारांनी बँकींगचा विस्तृत प्रमाणावर प्रसार केला, तशा प्रका- रचे आपल्या येथें सरकारकडून प्रयत्न झाले असे ह्मणतां येणार नाही. ज्या कांहीं थोड्याबहुत सवलती मिळाल्या त्यांचा फायदा युरोपियन भांडवलवाल्या बँकांसच मिळाला उलट हुंड्यांचे वेळीं विशेषतः एक्सचेंज बँकांचीच चैन झाली. पीपल्स बँक, स्पीसी बँक यांना सरकारकडून थोडी जरी मदत मिळाली असती तरी त्या बुडाल्या नसत्या. उलट त्यांना कोणत्याही तऱ्हेची मदत न मिळावी अशी खटपट युरोपियन वर्गांतून झाली असा लोकमवाद आहे.
 दुसरी अशी एक सचच ॲग्लोइंडियन लोकांकडून पुढे आणिली जाते की, हिंदुस्थानांतील लोकांस सोनें बगैरे मूल्यवान धातृत पैसा गुंतविण्याची संवय आहे त्यामुळे त्यांचा पैसा निरर्थक पडून राहतो, शिवाय नाणी, सोने, रुपें इत्यादि पुरुन ठेवण्याचाहो पद्धति प्रचलित असल्यामुळे नाणी चलनांत राहत नाहीत.या वरील गोष्टींत कांहीं अंशी तथ्य असले, तथापि, सर्वच दोष वरील कारणांच्या मार्थी मारतां येणार नाही. अनिश्चित चलनपद्धतीच्या योगानें उत्पन्न झालेला अविश्वास, सरकारच्या सहाय्याची उणीव, अशिक्षितपणा ही कारणे त्यांत प्रमुख आहेत हे लक्षांत ठेविलें