पान:रुपया.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७६ )

 आतां असे होण्याची कारणे अनेक आहेत व त्यांचे दुसरीकडे या पुस्तकांत विवेचन केलेले आहेच; तथापि जाता जाता थोड्या कारणांचा विचार करूं. हिंदुस्थान देश हा शेतकीप्रधान असल्यामुळे, येथे शेतकज्यांची लोकसंख्या अधिक असणे साह जिक आहे ते बहुतेक अशिक्षित असल्यामुळे व जुन्या पंढ्यां- प्रमाण बँकांच्या शाखा गांवोगावी नसल्यामुळे, बँकेच्या संस्थेचा उपयोग कसा करून घ्यावा याची त्यांस मुळीच माहिती नाही. त्यांस आपल्या गांवांतील सावकार बरा वाटतो पूर्वीपासून ही पद्धति चालत आल्यामुळे त्यांस एक प्रकारची संवयच पडल्यासा- रखी झाली आहे. कारण मुसलमानी अमदानी पूर्वापासून ते आतां - पर्यंत प्रत्येक लहानसहान खेड्यांत, जिल्ह्याचे ठिकाण, शहरांत, लहान मोठे सावकार, मारवाडी, सराफ हे आहेतच व ते कर्जाऊ पैसे देणे, ठेवी ठेऊन घेणे व हुंड्यांचा वगैरे व्यवहार करीत आले. आहेत. इतकेच नव्हे तर मुसलमानी बादशहा, पेशवे इत्यादीवर- ल सुद्धां त्यांचे वजन असे अलाकडे मात्र सहकारी पतपेढ्यांचेयोगाने शेतकरी लोकांची बरीच सोय होत आहे व त्यांस नवीन पद्धतीच्या बँकींगचीही थोडीशी माहिती होत आहे. बचतपेढ्यांचेमुळे मध्यम प्रतीच्या वर्गाची व कामकरीवर्गाचीही थोडी सोय झाली आहे हल्ली जरी मुंबई, कलकत्ता यासारख्या व्यापाराच्या केंद्रस्थानी देशी वि देशी बँकांची गर्दी झालेली असली; तथापि सराफ, मारवाडी, मुल- तानी बगैरे आपल्या देशी बँकर्सच्या हातांत बरीच सत्ता आहे.