पान:रुपया.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




हिंदुस्थानांत जो खलिता पाठविला त्यांतही पैशाचा कृत्रिम किंमत करणे अनिष्ट आहे व उत्तम चलन हे नेहमीं नैसर्गिक व स्वशक्तिप्रेरित असे असावे असे स्पष्ट लिहिले होते.

 हिंदुस्थानसरकारचे भत या सर्व मतांच्या विरुद्ध होते. हुंडणावळीच्या दरांच्या फरकामुळे बजेट करण्यांत होणारा घोंटाळा हे त्यांच्या मते त्यावेळच्या पद्धतीच्या विरुद्ध अतिशय प्रबळ कारण होते. रुप्याची किंमत स्थिर करून हुंडणावळीचा प्रश्न कायमचा सोडवून टाकावा असे त्यांना वाटले. दूरवर विचार न करितां त्यांनी तात्पुरत्या अडचणींकरितां पूर्वीचे चलन बदलून नवीन सुरू केले, परंतु दैवगति अशी विचित्र आहे कीं. सोन्याच नाणे करण्याचे १८९३ मध्ये ठरले असतां व नंतर १८९९ त फोलर कमिटीने हेच तत्त्व जोराने प्रतिपादन केले असतां, हिंदु स्थानांत अद्यापिही सोन्याचे चलन चालू नाहीं. हल्लीच्या पद्धता (Gold Exchange Standard अथवा सुवर्णसंलग्नचलन अस म्हणतात. हे चलन कसे आहे, याची पद्धति काय, याची तत्वे का हैं आतां पाहिले पाहिजे.