पान:रुपया.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७४ )

लोकांना होते. ते त्यांना असीरियन व बॅबिलोनियन लोकांगसून मिळाले असावे असा कित्येकांचा अदमास आहे इ. स. ८०८ अगर त्या सुमारास इटालीतील लोम्बार्डी शहरी पहिली बँक ज्यू लोकांनी स्थापिली. त्यानंतर इ. स. १९५७ चे सुमारास व्हेनिस लोकांनी बँका स्थापन केल्याबद्दल माहिती मिळते. परंतु युरोपांतील बँकिंगचे पद्धतीस फ्लॉरेन्स येथील सराफांच्या योगाने खरे चलन मिळाले असे ह्मणतात. बँक हा शब्द सुद्धां इटालियन Banco बांक या शब्दापासून निघाला आहे. पूर्वी फ्लॉरेन्स येथील सराफ बाजारांत अथवा रस्त्याच्या एका बाजूस बांकावर बसून पैशाचे देवघेवीचा धंदा करीत. ह्मणून पुढे हेच नांव कायम पडलें, सतराव्या शतकाच्या आरंभी इंग्लंडमध्ये हुंडीच्या पद्धतीस सुर- वात झाली. पुढे १६९४ मध्ये पॅटरसन नांवाच्या एका स्कॉच मनुष्याच्या हस्ते बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाली. यायोगानें खासगी सराफांच्या धंद्यास बराच आळा बसला. बँक ही संस्था त्यावेळी नवीन असल्यामुळे एकंदर व्यवहारांत चोखपणा आलेला नव्हता. सरकारने जर वेळोवेळी मदत करून या बँकेवरचीं अरिष्टे टाळली नसती तर बँक ऑफ इंग्लंडचें जे एक आज नमु नेदार उदाहरण झाले आहे ते झ लें नसते.वर वर्णिल्याप्रमाणे एक दोन शतकांपूर्वी इंग्लंडमध्ये व साधारणतः युरोपांतही हल्लीं- सारखा बँकामध्ये सुव्यवस्थितपणा आलेला नव्हता. त्यामुळे हिंदु- स्थानांत त्यावेळी आलेल्या इंग्लिश लोकांवर आमच्या इकडील