पान:रुपया.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १७२ ) कार नोटा काढते त्या निराळ्याच. हिंदुस्थानांत १८६६ पूर्वी प्रेसिडेन्सी बँकांना हा नोटा काढण्याचा अधिकार होता; पण पुढे तो रद्द करून, हिंदुस्थानसरकारच नोटा काढू लागलें हिंदुस्थान- सरकार जितक्या किंमतीच्या नोटा काढते, त्याबद्दल तिजोरीमध्ये गेखे, रुपें वगैरे रीतीनें तितक्या किंमतीचा ऐवज ठेवतें. यासंबंधी विस्तृत विवेचन पूर्वीच्या प्रकरणांत आलेले आहेच.खासगी पतीवरील कागदी चलन ह्मणजे हुंड्या, चेक्स, विनिमयपत्रे यां- चाही उपयोग हल्लीं वाढत्या प्रमाणांत आहे व बँकांचा प्रसार जसजसा जास्त होऊन लोकांचा त्यांवर विश्वास बसेल, तसे तसे हुंड्या, चेक्स् वगैरेंवर हल्लींपेक्षा जास्त प्रमाणांत व्यवहार चालतील. यांपैकी हुंड्यांची पद्धति ही आपणांस पूर्वीपासून माहित आहेच. फक्त चेक्स व बिलें हीं मात्र आह्मांस नवीं आहेत. यांचा व्यवहारांत उपयोग कसा होतो व हिंदुस्थानां- तील बँकांशी त्यांचा काय संबंध आहे हे पुढील प्रकरणांच दाखविले आहे.

( १७२)