पान:रुपया.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७१ )

 सरकारी पतीवरील चलनांत (नोटांत ) दोन भेद आहेत हैं व दाखविलेंच अ.हे. नोटासंबंधी एक मुख्य नियम असा आहे की, जेवढ्या नोटा सरकार काढते, तितक्याच किमतीचें सोनं किंवा रुमें सरकारी तिजोरीत ठेवावे लागतें. नाहीं तर एखादे प्रसंगी नोटा जास्त काढण्याचा सरकारचा मोह अनिवार होऊन, चलनाची वाढ विनाकारण होते व मग नोटा देऊन लोक जर पैसा मागूं लागले व तेवढी मागणी पुरविण्याइतकें सोनें, रुपें जर सरकारच्यापाशी नसले तर मग नोटा अपरिवर्तनीय ठरतात. अर्थात् त्यांची किंमत कमी होते व असे होणें सरकारास अनिष्ट आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्समध्ये असायनेट्स अपरिवर्तनीय झाल्या होत्या व हल्लीच्या महायुद्धापासून रशियामध्ये नोटा अपरिवर्तनीय झाल्या आहेत. सरकारावर जर लोकांचा भरंवसा असेल, तर कित्येक प्रसंगी नोटांचा अतिरेक झाला तरी त्यांवर विशेष परिणाम होत नाही. महायुद्धांत इंग्लंडनेंसुद्धां कागढी चलनाचा अतिरेक केला होता; परंतु इंग्लंडचे मंत्री व मुख्य बँकांचे मॅनेजर हे फार हुषार असल्यामुळे व सरकारवर लोकांची श्रद्धा असल्यामुळे, नोटा परिवर्तनीयच राहिल्या आहेत. यासंबंधी सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पिगो यांनी कॉटेंपोररी रिव्ह्यूमध्ये एक मननीय लेख लिहिला आहे. इंग्लंड, फ्रान्स वगैरे पाश्चात्य देशांत काहीं- एक विशिष्ट मर्यादेपर्यंत स्वतःच्या पतीवर नोटा काढण्याची पर- वानगी मोठ्या बँकांना देण्यांत आलेली आहे व त्याशिवाय सर-