पान:रुपया.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७० )

 आतां अधात्वात्मक पैशासंबंधी विचार करून हे प्रकरण पुरं करूं. येथे प्रथम हे सांगितले पाहिजे की, अधात्वात्मक अथवा कागदीचलन हें सर्वस्वी पतीवर अवलंबून आहे पतींच्या अर्था- संबंधाने अर्थशास्त्रज्ञामध्येसुद्धां मतभेद आहेत; पण अपांस त्यांशीं कर्तव्य नाहीं. ज्याप्रमाणें धात्वात्मकचलनामध्ये नाणं हे एक श्रमाच्या मोबदल्याचे चिन्ह आहे असे सांगितले, त्याप्रमाणे अथा- त्वात्मकचलनाची गोष्ट आहे. फक्त अवात्वात्मक अथवा काग़दी- चलनाची उभारणी - जरी पैशाचा निधि हा त्याचे बुडाशी असतोच तरी- री- मुख्यतः विश्वासावरच झालली आहे. जसजशी राष्ट्रांची प्रगति व व्यापाराची वाढ झपाट्याने होऊं लागली, तसा धात्वात्मक पैसा इतक्या मोठ्या उलाढालीस अपुरा पडूं लागला व ह्मणून अघाला- त्मक अथवा कागदी पैसा अस्तित्वात आला. आता यांतसुद्धां दोन मुख्य भेद आहेत. एक सरकारी पतीवरचें अथवा कायदे- शीर कागदी चलन व दुसरे खासगी अथवा बँका, व्यापारी यांच्या पतोवरचें कागदी चलन. हें खालीलप्रमाणे दर्शविता येईल.

अधात्वात्मक पैसा.

सरकारी अथवा कायदेशीर चला. खासगी पतीवरील कागदी चलन परिवर्तनीय नोटा. अपरिवर्तनीय नोटा हुन्धा. चेक्स विनिमयपत्रे, विलेनोरे