पान:रुपया.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६९ )

आकाराची नाणी चालू असल्यामुळे, कंपनीसरकारच्या एकछत्री राज्यकारभाराच्या पद्धतींत ती गोष्ट विसंगतपणा उत्पन्न करणारी होती. मद्रासला 'पॅगोडा' नांवाचे सोन्याचें नाणें (७ शिलिंगचें ) चलनांत होने, तर बंगालमध्ये रुप्याचें नाणें चलनांत होते. तेव्हां सर्व हिंदुस्थानांतील चलनांत व्यवस्थितपणा येण्याकरितां कांही- तरी सुधारणा करावी ह्मणून " ईस्ट इंडिया कंपनीच्या " अधिकारी- वर्गाने सन १८०६ मध्ये एक मसुदा तयार केला. या मसुद्याप्रमाणं सोने चलनांतून नाहीसे करावे अशी जरी कंपनी सरकारची इच्छा नव्हती, तरी पण, रुप्याचें नाणेंच मुख्य चलन करण्यावर त्यांचा प्रथम भर होता; परंतु पुढे सन १८१८ मध्ये मात्र मद्रासमधील. पॅगोडा' हे सोन्याचे नाणे बंद करून, त्याऐवजी रुपया हाच चलनांत आणला गेला. आतां, येथे एक गोष्ट नमूद करून ठेवण्यासारखी आहे, ती ही कीं, याच सुमारास ह्मणजे सन १८१६ मध्ये इंग्लंडनें सुवर्णैकचलनाचा स्वीकार केला, तथापि त्याचा परिणाम हिंदुस्थानावर मात्र कांहीं झाला नाहीं ! उलट हिंदुस्थानांत सोनें व रुपें दोन्ही चलनांत असतां, हिंदुस्थान देश गरीब आहे व तेथील लोकांस सोन्यापेक्षां रुपें अधिक आवडतें, अशा कंपनीच्या नोकरांच्या गैरसमजुतीमुळे ह्मणा अगर प्रामाणिक समजुतीमुळे ह्मणा, हिंदुस्थानांत रुप्याची एकचलनपद्धतीच सन १८३५ मध्ये सुरू झाली. यापुढील हकीकत पूर्वीच्या प्रकरणांत येऊन गेल्यामुळे पुनः देण्याचे कारण नाहीं.