पान:रुपया.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६८ )

प्रसार झाला होता. पेशव्याचे काळीही थोडीबहुत नाणी बाहेर निघत असत; परंतु त्या कालांत चलनाच्या बाबतीत विशेष कांहीं घडामोड झाल्याचें जुन्या कागडोपत्री आढळून येत नाही.
 ही हिंदुस्थानांतील चलनपद्धतीची संक्षिप्त रूपरेखा झालो हिंदुस्थान हा देश वर सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या वेळी अनेक प्रकारच्या राजांच्या अमलाखाली असल्यामुळे प्रत्येक प्रांताची नाणी निरनिराळ्या प्रकारची व वजनाचीं अशीं होतीं ह्मणून त्या- बद्दल सांगोपांग व क्रमशः माहिती मिळविणे हे काम कठिण व इतिहाससंशोधकांचें आहे. तेव्हां आपण आतां आपल्या मुख्य गोष्टीकडे वळू.
 इतर खासगी सावकार किंवा व्यापारी लोकांप्रमाणे, ईस्ट- इंडिया कंपनीने रुपये पाडण्याची परवानगी मोगलांकडून व मरा- ट्याकडून मिळविली होती व कंपनीचे 'कुंपणी सरकारां' त रूपां- सर होऊन सर्व हिंदुस्थानची सूत्रे तिच्या हाती येण्यापूर्वीच कंप- नीच्या रुपये पाडण्याच्या सचोटीमुळे तिचे रुपये लोकांस प्रिय झाले होते.
 यामुळे आजदेखील दस्तऐवजी ' रोख रुपये गाडी सुर्ती ' हा भयोग उपयोगांत येत असतो. पुढे सन १८०० च्या सुमारास सर्व हिंदुस्थान जवळ जवळ कंपनीसरकारच्या अमलाखाली आले ज्यावेळी प्रत्येक प्रांतांत निरनिराळ्या किमतीची, वजनाची व