पान:रुपया.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६७ )

माहिती दिली आहे. त्यावरून असे दिसून येते की, सबै प्रका- रचीं नाणी पाडण्याच्या त्यानें फक्त चार टांकसाळी ठेविल्या होत्या... एक आम्यान, एक बंगाल्यांत, एक अहमदाबादेस व एक काबुलांत. त्याचप्रमाणे रुपें व तांबे यांची नाणी पाडण्या- करितां त्याने दुसरी दहा ठिकाणे ठरविली होती व फक्त तांब्याची नाणीं पाडण्याकरितां ह्मणून सर्व हिंदुस्थानांत मिळून चोवीस ठिकाणी परवानगी दिली होती. अकबराचे काळी द्विचलनपद्धति सुरू होती असे ह्मणण्यास हरकत नाहीं. कारण सोन्याच्या होन, दिनार, मोहरा इत्यादि लहान मोठ्या नाण्यांबरोबर रुप्याचें रुपया हेंही नाणें प्रचारांत होतें. तांब्याचें दाम हें नाणें होतें. त्यानंतर श्रीशिवाजी महाराजांनीही आपले कारकीदीत टांकसाळी स्थापन केल्याचे दिसून येते; परंतु त्यांतील बहुतेक टांकसाळी खासगी लोकांच्या असून, त्या सरकारी परवानगीनें चालू केलेल्या असत. शिवाजी महाराजांचे काळीं दक्षिणेत मोहरांपेक्षा होन हेच जास्त उपयोगांत असावे असे दिसते. कारण अष्टप्रधानांचे पगार होनांत ठरलेले असत व त्याचप्रमाणे वर्षासन वगैरेही होनांत ठरल्याबद्दलचे उल्लेख जुन्या कागदपत्रांत व बखरीत आढळून येतात. त्याचप्रमाणे पन्हाळ्यास रुपयांची टांकसाळ असावी असे वाटतें. कारण दक्षिण महाराष्ट्राकडील भागांत पन्हाळी रुपया अजूनसुद्धां प्रसिद्ध आहे; परंतु या सर्वापेक्षां शिवकालीन तांब्याचे नाण्याचा हाणजे " शिवराई " चा चोहोंकडे