पान:रुपया.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६६ )  सम्राट् अशोकाच्या नांवाची जी नाणी आज सांपडली आहेत, त्यावरून नाण्यांसंबंधी आमची प्रगति दिसून येते.त्यानंतर पहिल्या व दुसव्या * कॅडफायसिस्" नांवाच्या राजांनी नाण्यांत बरीच सुधारणा घडवून आणिली. तसेच स्कंद्रगुप्त व पुरगुप्त यांनीही टांकसाळी व नाणी यासंबंधत बरेंच लक्ष पुरवि- ल्याचे दिसून येतें. पुढे मुसलमानांचे कारकीर्दीत महमद तप- लकाने टांकसाळींतून हिणकस नाणी काढून स्वान्यांच्या व चैनीच्या पायी झालेल्या कर्जातून मुक्त होण्याचे जे हास्यास्पद प्रयत्न केले, त्यांचे विस्तृत वर्णन वाचकांनी मूळ इतिहासांतच वाचावे अशी आह्मी शिफारस करितो.
 अकवरचे कारकीर्दीपासून माल चलनाची व्यवस्थेशीर माहिती लागते. अकबराचे वेळी हिंदुस्थानचा बराचसा भाग एकछत्रा- खाली आल्याकारणाने, इतर सुधारणेबरोबर चलनपद्धतीसही त्याचे कारकीर्दीत व्यवस्थेशीर चळण दिले गेले. यापूर्वी युरोपा- प्रमाणे येथेंसुद्धां खासगी टांकसाळी फार होत्या, त्या सर्व त्याने कायदे करून नाहीशा केल्या. त्याचप्रमाणे मुख्य नाणी व उप- नाणी असे भेद करून, त्याने प्रत्येक प्रकारच्या टांकसाळींची

संख्या मर्यादित केली. ऐनी अकवरीमध्ये यासंबंधाने बरीचशी


See Havell's Hist ry of Aryan Rule in India Page 142-174.